आजपासून सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी…!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 53 Second

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर

MEDIA CONTROL ONLINE

सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे जे एकदा वापरल्यानंतर जे फेकून दिलं जातं. अशा प्रकारचं सिंगल यूज प्लास्टिक रिसायकल केलं जाऊ शकत नाही. सिंगल यूज प्लास्टिक जाळूनही टाकलं जातं नाही. ते जमिनीखाली पुरलं जातं. त्यामुळे पर्यावरणाला कित्येक वर्षांपर्यंत नुकसान होत राहतं. सिंगल यूज प्लास्टिक पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर अमूल, मदर डेअरी आणि डाबर सारख्या कंपन्यांनी सरकारला आपला निर्णय काही काळासाठी रद्द करण्याची मागणीही केली होती. देशातील सर्वात मोठा डेअरी समूह असलेल्या अमूलने काही दिवसांपूर्वी सरकारला पत्र लिहून प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशातील शेतकरी आणि दूधाच्या विक्रीवर नकारात्मक प्रभाव पडेल असंही अमूलने म्हटलं आहे. पाच रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंतच्या ज्यूस आणि दूधाच्या प्रोडक्ट्सचा भारतात मोठा व्यापार आहे. अमूल, पेप्सिको, कोका-कोला, मदर डेअरी सारख्या अनेक कंपन्या पेय पदार्थ प्लास्टिक स्ट्रॉसह ग्राहकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच बेवरेज कंपन्या अर्थात शीतपेय कंपन्या त्रस्त आहेत

प्लास्टिक स्टिक ईयर-बड, फुग्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिक झेंडे, कॅण्डी स्टिक, आइस्क्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरलं जाणारं पॉलिस्टाइनिन, प्लास्टिक प्लेट, कप, ग्लास, चमचे, काटे चमचे, चाकू, ट्रे, स्टरर, १०० मायक्रोनहून कमीचं प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, मिठाईच्या बॉक्सवरील प्लास्टिक, इन्हिटेशन कार्ड्स, सिगारेट पॅक अशा वस्तूंच्या वापरावर बंदी केली जाणार आहे. सिंगल यूज कचऱ्यापासून होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून ही ठोस पाऊलं उचलली गेली आहेत

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *