तुमचे अश्रू म्हणजे माझी ताकद आहे, तुमच्या ताकदीशी मी कधीच गद्दारी करणार नाही : उद्धव ठाकरे

MEDIACONTROL ONLINE 

नव्या सरकारच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पहिल्यांदा त्यांनी नव्या सरकारचं अभिनंदन केलं, त्यांना महाराष्ट्रहिताचे निर्णय घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या. भाजपने तथाकथित शिवसैनिक मुख्यमंत्री केला म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्व आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. कांजूरमार्गचा निर्णय कायम राहू द्या, अशी विनंती त्यांनी नव्या सरकारला मुंबईकर म्हणून केली. सरतेशेवटी लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानताना उद्धव ठाकरे काहीसे भावूक झाले.

 मला जे काही मेसेज आले, मला सोशल मीडियातून जे प्रेम मिळालं, त्याबद्दल जनतेचा मी ऋणी आहे. असं क्वचित होत असेल, एखादा माणसू अनपेक्षितपणे आल्यानंतर पद सोडताना लोकं रडतात. ही माझी कमाई आहे, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत, त्याप्रती माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही, गद्दारी होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कदाचित आज पहिल्यांदा माझा चेहरा पडला असेल, मला खरोखर दु:ख झालंय. माझ्यावर तुमचा राग आहे ना, तो राग माझ्यावरच काढा, मुंबईवर काढू नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. आरेचा निर्णय बदलला, त्यामुळे मला दु:ख झालंय. मी पद सोडताना अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. मला सोशल मीडियातून जे प्रेम मिळालं, त्याबद्दल जनतेचा मी ऋणी आहे. असं क्वचित होत असेल, एखादा माणसू अनपेक्षितपणे आल्यानंतर पद सोडताना लोकं रडतात. ही माझी कमाई आहे, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत, त्याप्रती माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही, गद्दारी होणार नाही. तुमची अश्रू म्हणजे माझी ताकद आहे. तुमच्या ताकदीशी हरामखोरपणा करणार नाही. सत्ता येते जाते, पण असं प्रेम मिळायला भाग्य लागतं असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *