रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे डॉक्टर्स डे आणि सी एस डॆ उत्साहात…!

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१:

Advertisements

१ जुलै हा जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे म्हणून साजरा केला जातो. याचे ॵचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे नामांकित डॉक्टर व सी ए यांचा सन्मान प्रेसिडेंट प्रशांत उर्फ उदय पाटील आणि सेक्रेटरी स्वप्निल कामत व कौन्सिलर दिलीप प्रधाने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. यु डी संत, राजसिंह सावंत, माधवी शिंदे लोकरे, विशाल चोकाक कर, व सी ए निशिकांत सावर्डेकर, उमेश पोवार यांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी अध्यक्ष दिलीप शेवाळे, जयंत मुळे, संभाजी पाटील, विशाल जांभळे, प्रमोद चौगुले, डॉ सुधीर गिरी, इरफान बोरगावे व सर्व रोटरी मेंबर्स उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *