भाजप उद्योग आघाडीच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना दिली नियुक्ती पत्रे

कोल्हापूर/ प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीनं, उद्योग क्षेत्राला गतीमान करण्यासाठी स्वतंत्र जिल्हा कार्यकारिणी बनवली आहे. भाजपच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्रं देण्यात आली. जास्तीत जास्त स्टार्टअप सुरू व्हावेत, तसंच उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात, यासाठी भाजपची उद्योग आघाडी कार्यरत आहे. नुतन कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून भरत पाटील, कोल्हापूर शहरप्रमुख म्हणून धैर्यशील पाटील, शहर कार्याध्यक्ष समरजित निंबाळकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख दिपा माने, शहर महिला आघाडी प्रमुख सीमा शहा, इचलकरंजी महिला आघाडी प्रमुख कविता माने, कागल तालुका अध्यक्ष रोहन साबळे, करवीर तालुका अध्यक्ष अशोक काटकर, शाहुवाडी तालुका अध्यक्ष बी एस पाटील, भुदरग तालुका अध्यक्ष सतीश जाधव, राधानगरी तालुका अध्यक्ष अनिल कातिवले, हातकणंगले तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष देवराज सुतार, आजरा तालुका अध्यक्ष निखिल पाटील, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष पृथ्वीराज तारळे, चंदगड तालुका अध्यक्ष पी टी पाटील, गगनबावडा तालुका अध्यक्ष सुरेश लोंढे यांची नियुक्ती झाली आहे. तर शहर महिला आघाडी उपाध्यक्षा अश्‍विनी पाटील आणि जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा वेदा गांधी यांची नियुक्ती झाली आहे. या सर्व पदाधिकार्‍यांना नुकतीच नियुक्ती पत्रे देण्यात आली. कोल्हापुरातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी, उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात, यासाठी भाजप उद्योग आघाडीने कार्य करावे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *