Share Now
Read Time:1 Minute, 13 Second
MEDIACONTROL ONLINE
शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आणि बहुमत सिध्द केले. बहूमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर ९९ आमदारांनी महाविकासआघाडी ला मतदान केलं.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज बहुमत चाचणीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर काही आमदार आपला अनुक्रमांक उच्चारत असताना विरोधी बाकांवरील आमदारांनी घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांचा अनुक्रमांक येताच आज पुन्हा ‘ईडी-ईडी’ अशा घोषणा देण्यात आल्या. पण आज यामिनी जाधव यांनी हात जोडत सर्वांना उत्तर दिलं. कालही अशीच घोषणाबाजी झाली तेव्हा यामिनी जाधव यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.
Share Now