Share Now
Read Time:58 Second
MEDIA CONTROL ONLINE
एकनाथ शिंदे सरकारने आज विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. त्या धक्क्यातून मविआ सावरत नाही तोच उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचं पत्र विधिमंडळ सचिवालयाने शिंदे यांना दिलं आहे. तसेच अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती देखील रद्द केली आहे. त्यानंतर विधिमंडळ सचिवालयाच्या कारवाईला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, अशी भूमिका शिवसेनेने आता घेतली आहे. दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटातील ही कायदेशीर लढाई आणखी धारदार होण्याची शक्यता आहे.
Share Now