कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारे गाव म्हणजे कळंबा,याच गावात एक तलाव आहे ज्याला १३९ वर्षे पुर्ण होत असून तो ऐतिहासिक आहे .
कळंबा हा तलाव गोड्या पाण्याचा तलाव आहे त्याशिवाय तो पिण्यासाठी देखील योग्यच असल्याने या तलावाला एक दुर्मिळ उदाहरणच लाभले आहे.
१ जुलै १८८१ रोजी कळंबा तलावाची निर्मिती झाली तर यंदा १ जुलै २०२२ रोजी या ऐतिहासिक तलावाला १३९ वर्ष पुर्ण झाली आहेत.दरवर्षी पावसाळ्यामध्ये कळंबा तलाव हे कोल्हापूरकरांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते. मात्र यंदा जिल्ह्यात यावर्षी पावसाने विश्रांती घेतल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कळंबा तलाव यावर्षी कोरडाच असल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तो जुलै महिन्यात ओसंडून वाहत होता मात्र यावर्षीचे कलंबा तलावाचे चित्र सध्या वेगळे दिसत आहे.
२०२२ या चालू वर्षी अनियमित पडणारा पाऊस आणि बदललेलं वातावरण पाहता जुलै अखेर पर्यंत कळंबा तलाव भरण्याची शक्यता अधिक धुसर आहे.
त्यामुळे सध्या “”कळंबा तलाव उशाला, कोरड मात्र घशाला….”” असंच म्हणावं लागतय
यावर्षी कळंबा तलावाला १३९ वर्षे पूर्ण होत असून या ऐतिहासिक कळंबा तलावाचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. तलावाच्या आसपास मोठ्या प्रमाणात गाळ आहे. तसेच तलावातील शाहूकालीन विहिर सुद्धा नादुरुस्त अवस्थेत झाली आहे.कित्येक वर्षे याच विहिरी मार्फत पाण्याच्या खजिनापर्यंत पाणी आणून कोल्हापुरकरांची तहान भागवली जायची. मात्र तलावाची सद्य स्थिती पाहता या गोड्या पाण्याच्या तलावाचे वेळीच संवर्धन होणे गरजेचे आहे, स्थानिक प्रशासनाने वेळीच तलावाच्या संवर्धनाचा विचार केला पाहिजे, अन्यथा काळाबरोबर तलावसुद्धा नामशेष होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तसेच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसामध्ये पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला कळंबा तलाव यावर्षी मात्र अजूनही कोरडाच आहे.
व्हिडिओ लिंक….👇👇