डॉक्टर तरुणीचा संशयास्पद मृत्यू कोल्हापूर शहरातील घटना : इजेक्शन व बाटली जप्त….!

प्रकाश कांबळे

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील एका खासगी रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणाऱ्या डॉ. अपुर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (वय ३० रा. ताराबाई पार्क) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घरापासून थोडया अंतरावर रस्त्याकडेला एका बाकड्यावर रविवारी सकाळी ६ वाजता मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ सिरीज व विषाची रिकामी बाटली सापडली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Advertisements

शहरातील एका खासगी रुग्णालयात सर्जन तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या डॉ. अपूर्वा हेंद्रे यांनी अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव कमावले होते. त्या अविवाहित असून ताराबाई पार्क येथे आई वडील,भाऊ अशा कुटुंबात राहत होत्या. शनिवारी मध्यरात्री त्या घरी आल्या होत्या. त्यानंतर काही काम आहे, असे सांगून रात्रीच घरातून बाहेर पडल्या.

रविवारी सकाळी सहा वाजता फिरायला गेलेल्या लोकांना ताराबाई पार्क परिसरातील एका मॉलपासून थोड्या अंतरावर रस्त्याकडेला असलेल्या बाकड्यावर डॉ. अपूर्वा हेंद्रे या बेशुध्द पडलेल्या दिसल्या. लोकांनी कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांचा भाऊ तेथे आला. भावाने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने सीपीआर रुग्णालयात आले. सहायक पोलीस निरीक्षक इंगवले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाजवळ सिरीज व विषाची रिकामी बाटली मिळाली आहे. त्यामुळे अपूर्वा यांनी स्वत: इजेक्शन टोचून घेतले की अन्य कोणी त्यांना इंजेक्शन दिले याचा तपास पोलीस करीत आहेत. एका डॉक्टर तरुणीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *