रोटरी क्लब ऑफ करवीरच्या प्रेसिडेंट पदी प्रशांत उर्फ उदय पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ करवीर चा पदग्रहण सोहळा नुकताच रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे पार पडला. या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे आणि असिस्टंट गव्हर्नर सुभाष कुत्ते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. सन १९२१/२२ चे प्रेसिडेंट जयंत मुळे यांनी वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. असिस्टंट गव्हर्नर सुभाष कुत्ते यांनी त्यांचे कौतुक केले. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांनी नवीन वर्षातील उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. हे उपक्रम तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन त्यांनी दीले.

Advertisements

 नवनिर्वाचित प्रेसिडेंट उदय पाटील आपल्या मनोगतात म्हणाले छत्रपती ताराराणींच्या पदस्पर्शाने व कर्तृत्वाने पावन झालेली ही करवीर नगरी आणि रोटरी च्या माध्यमातून करवीर क्लब मध्ये काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावर्षी आपली आंतरराष्ट्रीय थीम आहे इमॅजिन रोटरी! या इमॅजिन रोटरी चे नियोजन आम्ही ऑलरेडी केले आहे. रोटरीच्या सात अव्हेन्यू प्रमाणे त्याचे मायक्रो प्लॅनींग ही झालेले आहे. माझी टीम घेऊन हे कार्य मी वेळेत नक्की पूर्ण करेन आणि करवीरचा झेंडा दीमाखात फडकावेन!

 सन २२/२३ साठीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रेसिडेंट पदी प्रशांत उर्फ उदय पाटील, सेक्रेटरी पदी स्वप्निल कामत तर ट्रेझरर म्हणून पंडित जाधव यांची निवड करण्यात आली. कौन्सिलर म्हणून दिलीप प्रधाने मदत करणार आहेत. या कार्यक्रमास जयंत मुळे, निशिकांत नलवडे, निलेश बोधले, इरफान बोरगावे, डाॅ.संदीप पाटील, संभाजी पाटील, प्रमोद चौगुले , अंकुश कारंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप शेवाळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *