Share Now
Read Time:1 Minute, 8 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१३ :
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी येथे अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराची स्थिती निर्माण झाली आहे. धरणक्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सद्य स्थितीला ३५ फुटांवर पाणी पातळी आहे.
आज सकाळी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी राधानगरी धरण येथे भेट देउन तेथील परीस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की राधानगरी धरण ५५% भरले असुन आता सुरू असलेला पाऊस पाहता येत्या ८ ते १ दिवसात राधानगरी धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या गावांना त्यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे
Share Now