Share Now
Read Time:1 Minute, 13 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीहून कोल्हापूरला येणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन झाल्याने ते आज कोल्हापूरला येत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळ त्यांच्यासोबत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसही असण्याची शक्यता आहे.
आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री विमानाने कोल्हापूरला येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. तिथून ते छत्रपती संभाजी पार्क येथील पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतील आणि सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या सांत्वनासाठी ते कोल्हापूरला येत आहेत.
Share Now