Share Now
MEDIACONTROL ONLINE :
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेतली. दिल्लीतील संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुर्मू यांना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. सकाळी सव्वादहा वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी समारंभ पार पडला.
या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी, सरकारी विभागांतील अधिकारी उपस्थित होते. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभाच्या समारोपानंतर, मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. तेथे त्यांना आंतर-सेवा गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात येईल.
Share Now