#Wakad : महिला सुरक्षा जनजागृतीसाठी रविवारी मॅरेथॉन

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 11 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – प्रजासत्ताक दिनानिमित्ताने वाकड येथे मुंबई -बॅंगलोर हायवे लगत महिला सुरक्षा जनजागृती साठी “रन फॉर वुमेन्स सेफ्टी”मॅरेथॉनचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयोजक डॉ. सुरेश संघवी यांनी दिली.

रविवारी (दि. 26 जानेवारी 2020 रोजी) सकाळी 5 वाजता मुंबई- बॅंगलोर हायवे लगत असलेल्या लाईफ पॉइंट मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासमोर मॅरेथॉनचे उदघाटन होईल. हि मॅरेथॉन बालेवाडीच्या दिशेने हायवे लगतच्या सर्व्हिस रोडने वाकड परिसरातून वाघमारे कॉर्नर-प्रेस्टीज स्क्वेअर रोड-माऊली चौक- तत्वा हॉटेल- डावीकडे वळून पुन्हा याच मार्गाने स्पर्धक लाइफपॉइंट रुग्णालयासमोर येतील.

यावेळी वाहतूक शाखेच्या सहाय्यक आयुक्त नीलिमा जाधव,गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,विठ्ठल काटे,मयूर कलाटे,प्रज्ञा खानोलकर, अश्विनी वाघमारे आदी उपस्थित राहणार आहे.

10 किमी, 5 किमी, 3 किमी अंतर या गटातील विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात येईल.या दौडमध्ये सर्व गटातील स्त्री पुरुषांना सहभागी होता येईल.तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेकांना टी- शर्ट,मेडल,सहभागाबद्दल प्रमाणपत्र,आकर्षक बॅग दिली जाईल. दौड आयोजनासाठी डॉ.सुरेश संघवी,डॉ. कैलास बोथारे, डॉ.जगदीश जाधव,डॉ. सपना सगरे, सागर गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *