#Pune : लाइफपॉइंट रुग्णालयातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये साबळे, सिंग, ताम्हणकर, धडधडे ठरले विजेते

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – मुंबई- बॅंगलोर महामार्गलगत असलेल्या वाकड येथील लाईफपॉइंट मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ५ किलोमीटर गटात पुनम साबळे, इंद्रप्रीत सिंग तर, १० किलोमीटर गटात पंचमी ताम्हणकर, संतोष धडधडे हे विजेते ठरले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त लाइफपॉइंट रुग्णालयातर्फे महिला सुरक्षा जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या केलेल्या मॅरेथॉनचे उदघाटन नगरसेवक मयूर कलाटे यांनी झेंडा दाखवून केले.

Advertisements

सकाळी सहा वाजता मुंबई- बॅंगलोर महामार्गलगत असलेल्या लाईफपॉइंट मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासमोर मॅरेथॉनचे उदघाटन करण्यात आले. हि मॅरेथॉन बालेवाडीच्या दिशेने हायवे लगतच्या सर्व्हिस रोडने वाकड परिसरातून वाघमारे कॉर्नर-प्रेस्टीज स्क्वेअर रोड-माऊली चौक- तत्वा हॉटेल- डावीकडे वळून पुन्हा याच मार्गाने स्पर्धक धावले. या मॅरेथॉनची लाइफपॉइंट रुग्णालयासमोर सांगता करण्यात आली.

बक्षीस वितरणप्रसंगी लाइफपॉइंट रुग्णालयाचे संचालक डॉ.सुरेश संघवी,डॉ. कैलास बोथारे, डॉ.जगदीश जाधव,डॉ. शोभा संघवी,डॉ. प्रतिभा बोथारे,डॉ.सपना सगरे आदी उपस्थित होते.

१० किमी, ५ किमी, ३ किमी अंतर धावणाऱ्या विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह तर सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना पदक देण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये सर्व गटातील सुमारे ३०० स्त्री पुरुष सहभागी झाले होते. आयोजनासाठी लाइफपॉइंटचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रक्षीता इंदूरकर तर आभार सागर गायकवाड यांनी मानले.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : ५ किमी महिला गटात
पुनम साबळे( वेळ ३२:२४), संघमित्र पानी( ३२:४७),पुजा बागवे(३७:२२)

पुरुष-इंद्रजित सिंग( २३:२७),सुनील ठाकुर(२४:३१),संदीप निकम(२६:५५)

१० किमी पुरुष महिला :
पंचमी ताम्हणकर(५७:३२),संग्राम भाटिया(५८:४६),ॲंसी डॅनियल (१:१४:१८),

पुरुष- संतोष धडधडे(४२:०७), अनिल मोरे(४३:०३), धनराज हेळंबे( ४६:५०)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *