#Maval : रोटरी क्लबने भागविली सावळा गावाची तहान; सौर ऊर्जा संचलित उभारला जलसिंचन प्रकल्प

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 20 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने पुजा कास्टिंग चाकण आणि मावळ प्रबोधिनी यांच्या सहकार्याने दुर्गम भागातील सावळा गावामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना शेती व पिण्यासाठी सौर ऊर्जा संचलित २० एचपी मोटारच्या सहाय्याने जलसिंचन प्रकल्प उभारला आहे. यामुळे सावळा गावाला मुबलक पाणी उपलब्ध केल्याने (ता. मावळ) नागरीकांची तहान भागावली.

या प्रकल्पाच्या उदघाटन व लोकार्पण प्रसंगी क्लबचे अध्यक्ष विजय काळभोर,सचिव प्रणीता अलूरकर,डॉ. प्रवीण घाणेगावकर,पुजा कास्टिंगचे संचालक अनिल कुलकर्णी,पुजा कास्टींग चे संचालक संकेत कुलकर्णी,राहुल रांका,दक्षेंद्र आगरवाल, जयश्री कुलकर्णी, केशव मनगे,गुरूदीपसिंग भोगल,हरिश्चंद्र उडगे,संजीव अलूरकर,साधना काळभोर,रमा मनगे,मावळ प्रबोधिनीचे रवींद्र भेगडे,कमल कौर आदी उपस्थित होते.

यावेळी काळभोर म्हणाले कि,एकूण २८ लाखाचा हा प्रकल्प असून यापैकी २० लाख रुपये पुजा कास्टिंग ने सीएसआर फंडातून दिले. पुजा कास्टिंग च्या मदतीने ठोकळवाडी धरण ते सावळागाव सुमारे २ किलो मीटर अंतराची पाईप लाईन टाकण्यात आली .यामुळे सुमारे ६० एकर जमीन बारामाही ओलिताखाली येणार आहे.या जलसिंचन प्रकल्पा साठी २० पॉवर हॉर्स ची मोटार बसविण्यात आली आहे.

अंदर मावळ भागात केवळ ४ महिने पाऊस असल्याने फक्त भाताची शेती केली जाते.वर्षभर नगदी पीक घेता येणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.रोजगार उपलब्ध होईल.येथील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *