बचत गटातील महिलांपर्यंत शासकीय योजना, उपक्रम व कायद्यांची माहिती पोहोचवा -मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : जिल्ह्यातील बचत गटातील अधिकाधिक महिलांना विविध माध्यमांद्वारे शासकीय योजना, उपक्रम व महिलांसाठीच्या उपयुक्त कायद्यांबाबतची माहिती पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या. […]