कोल्हापूर प्रतिनीधी: अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे येथील उद्योगपती सचिन पाटील यांच्या सहकार्याने राधानगरी भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दुर्गम गावातील १९ शाळांमधील मुलांना वह्या व पेन यांचे वाटप करण्यात आले.
देशाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत शैक्षणिक साहित्य वाटप केले. असल्याचे व पुढील काळामध्ये दुर्गम भागातील शाळांची गैरसोयहोत असलेल्या गोष्टीची दखल घेऊन अधिक मदत करणार. असे युवा उद्योजक सचिन पाटील यांनी या वेळी सांगितले.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे शाळांचे मुख्याध्यापक व पालक आणि ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.
त्यांनी कासारपुतळे, कासारवाडा पा. , सावर्डे पा.,माजगाव ,दोनवडे चाफेवाडी ,भटवाडी, शिवडाव,केलोशि बु.,बुरबळे,भोपळे वाडी,अनफ खुर्द,या सह १९ गावाततील शाळांना वह्या व पेन वाटप करण्यात आले.
या वेळी प्रकाश पाटील उपजिल्हा प्रमुख संजय गांधी निराधार योजना, शिवसेनेचे रमेश जाधव सतीश मोरसे, बाबुराव बसरवाडकर त्या त्या गावातील ग्रामपंचायत ,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.