पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीचा थरार १९ ऑगस्टला रंगणार…!

कोल्हापूर: महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली ३ युवती आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोव्हीड संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यंदा शुक्रवार, १९ ऑगस्ट २०२२ रोजी युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा. आयोजित केली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक मैदान येथे तब्बल ३ लाख रूपयांची दहीहंडी फोडण्यासाठी, गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावतीने दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. शिवाय युवती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणान्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. पहिल्याच प्रयत्नात पाच थर रचून सलामी देणान्या गोविंदा पथकाला ५ हजार रूपये आणि सहा थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणान्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आली आहे. त्यासाठी समीट अॅडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर्सचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दहीहंडी फोडणारा गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. शिवाय महिला गोविंदा पथकांना २५ हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक अशा दसरा चौक मैदानावर दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन केले आहे. उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, निमंत्रित मान्यवरांसाठी मध्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. कलाकारांचा नृत्याविष्कार आणि ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण होणार आहे. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल भी वरून थेट प्रक्षेपण होणार आहे. युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. या स्पर्धेला बालाजी कलेक्शन, काले बजाज, समृध्दी सोलर आणि साजणीचे अमित ट्रेडर्स हे प्रायोजक आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले, दहीहंडी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूर वासियांनी १९ ऑगस्टला ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *