चाफोडीत मूकनायक ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न..

कोल्हापूर : ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत चमकतात हा विश्वास दृढ करून जगभरात बुद्धीच्या सामर्थ्याचा राजा मानल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यरत राहून चाफोडी तालुका करवीर या ठिकाणी संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची स्थापना स्वातंत्र्य दिनाच्या या अमृत महोत्सव दिनी करण्यात आली. या ग्रंथालयाचे उद्घाटन चाफोडी गावातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मंगल हस्ते करण्यात आले.

जर भारत देश सक्षमपणे उभा करायचा असेल तर प्रत्येक गावात कार्यरत असणारी ग्रंथालय निर्माण झाली पाहिजेत. विद्यार्थी व देशातील प्रत्येक नागरिक प्रशासन, राजकारण, उद्योग आणि विविध क्षेत्रात पारंगत झाला पाहिजे हा उद्देश व हेतू ठेवून चाफोडी येथील संघर्ष ग्रुप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय वाचनालयाची स्थापना करण्यात आली. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या ग्रंथालयाचे साध्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या ग्रंथालयाच्या माध्यमातून भविष्यकाळात “शब्दप्रबुद्ध” व्याख्यानमाला आयोजित करणे, ग्रंथालयात अभ्यासिका सुरु करणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करणे, शाळेतील व ग्रंथालयातील विविध पुस्तकांवर विद्यार्थी,युवकांच्या चाचण्या घेणे.हा उद्देश ठेवून हे निर्माण करण्यात आल्याचं ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष वैभव प्रधान यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात सांगितल. यावेळी सरपंच पंढरीनाथ भोपळे, बांधकाम कामगार आघाडीचे जिल्हा नेते व ग्रामपंचायत सदस्य संजय सुतार, ग्रामसेवक सागर पोवार, युवा नेते महादेव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त व्यक्त करून. अशी वाचनालय प्रत्येक ठिकाणी निर्माण झाली तर निश्चितपणान भारताचा नागरिक सक्षम पणे उभा राहील असा विश्वास व्यक्त करून वाचनालयाचा उद्देश ,हेतू ऐकून हे वाचनालय भविष्यकाळात मोठी भरारी घेईल अशा शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमात तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, युवा नेते मारुती पोवार, ग्रंथालयाचे मार्गदर्शक मधुकर कांबळे, बळवंत कांबळे,बबन कांबळे,अंकुश कांबळे,प्रकाश कांबळे,विश्वास कांबळे, आर.पी.आयचे तालुका संघटक सागर कांबळे, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष सत्यजित कांबळे, ग्रंथपाल विनोद कांबळे, सदस्य साताप्पा कांबळे, शितल कांबळे, वैशाली कांबळे, सुहास कांबळे, वनिता कांबळे, वैदही प्रधान, महादेव कांबळे आदी. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *