Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : धार्मिक गोष्टींच्या नावाखाली चाललेले अश्लील प्रकार थांबले पाहिजेत. कोल्हापूर शहरामध्ये मंडळांच्या जत्रा असतात. या जत्रेमध्ये आता मुलींना नाचवण्याचे प्रकार वाढले आहे. अशाच एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील हावभाव असलेला डान्स व्हायरल होत आहे.डीजे लावून तरुण बेफानपणे नाचत आहे. डीजेच्या समोरच एक स्टेज उभा करण्यात आला आहे. या स्टेजवर मुलींना उभं करण्यात आलं आहे. या मुली अश्लिल हाव भाव करत बिभत्सपणे डान्स करत आहे. यामध्ये काही तृतीयपंथींच्याही समावेश आहे. एवढंच नाहीतर या मुली डान्स करत असताना सिगारेट सुद्धा ओढत असताना दृश्यात दिसत आहे. याचा तीव्र निषेध कोल्हापूर मधील जनता करत आहेत.कारण अशा गोष्टी मुळे आपल्या शहराचे तसेच आपल्या संस्कृतीचे नाव खराब होऊ शकते अशा गोष्टींना वेळीच आळा घालावा अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले प्रशासनाकडे करत आहेत.
संतापजनक म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोरच हे सगळे कृत्य सुरू होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तीव्र निषेध शिवसेना शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार ते प्रशासनाकडे करणार असून असली कृत्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये आज तक्रार दाखल केली जाणार आहे.