राष्ट्रीय हाॅकी पंच सिद्धी जाधव यांची निवड…

  • कोल्हापूर दि.15 हाॅकी इंडिया मार्फत कोल्हापूरच्या राष्ट्रीय ज्युनिअर पंच कु. सिद्धी जाधव यांची नवी दिल्ली येथे दि. १६ ते २३ ऑगस्ट २०२२ अखेर होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया ज्युनिअर मुली हाॅकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली …….. विशेष बाब म्हणजे यापूर्वी कू. सिद्धि जाधव यांनी ग्वालियर व अमरावती येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर मुली व अखिल भारतीय महिला हाॅकी स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिले आहे. …..तसेच खेळाडू म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय सब जुनियर मुलींच्या हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे ….कू. सिद्धी या डॉ.विजयसिंह यादव महाविद्यालय (पेठ वडगाव) व देवगिरी फायटर्स च्या
    खेळाडू आहेत…… . कू. सिद्धी याना हॉकी महाराष्ट्राचे सेक्रेटरी -मनोज भोरे, हॉकी कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी व सदस्य या सर्वांचे प्रोत्साहन तसेच क्रीडाशिक्षक श्री. संताजी भोसले , हाॅकी प्रशिक्षक राहूल गावडे श्री. दिग्विजय नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *