आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आता एक मिस कॉल वर होणार मतदान नाव नोंदणी…!

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘एका मिस्डकॉलवर मतदार नोंदणी’ ही योजना, केवळ राज्यभर नव्हे तर देशभर काँग्रेसच्या माध्यमातून राबवण्यासाठी प्रयत्न करू. असं प्रतिपादन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. ते हॉटेल सयाजी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

 नवीन मतदारांची नोंदणी सुलभ व्हावी यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. केवळ ‘एका मिस्डकॉलवर मतदार नोंदणी’ करण्याची सुविधा जिल्ह्यातील नवमतदारांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार २० ऑगस्ट रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आम. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हॉटेल सयाजी येथे या योजनेचा शुभारंभ झाला.यावेळी, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार थोरात यांनी, काँग्रेसचे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे नवनवीन संकल्पना राबवून काँग्रेस पक्षाला ताकत देण्याचं काम करत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचं त्यानी सांगितलं. 

Advertisements

 यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य बाजीराव खाडे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, शशांक बावचकर, काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष,युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

खालील नंबर वर मिस कॉल देऊन आपली मतदान नाव नोंदणी करा…

👉👉 9672599990

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *