२५ व २६ ऑगस्ट रोजी केआयटी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन…!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 57 Second

विशेष वृत्त शिवाजी शिंगे

कोल्हापूर : केआयटीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, भारतीय शिक्षण मंत्रालय, इनोव्हेशन सेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक येत्या २५ आणि २६ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन होणार आहे. एकूण १५ राज्यातील २६ निवडक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील ६ विविध समस्यांवर या संघातील विद्यार्थी कोडींग च्या माध्यमातून उपाय देण्याचा प्रयत्न करणार असून यामध्ये भारत सरकार मधील विविध मंत्रालय विभागातील तसेच खाजगी क्षेत्रांतील आस्थापनातून आलेल्या विविध समस्यांचा समावेश आहे.

या स्पर्धेच्या नियमानुसार सलग ३६ तास हे विद्यार्थी विविध प्रश्नांवर काम करणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील ४०० महाविद्यालयातून एकूण ५४ महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर केआयटीचे स्वायत्त अभियांत्रिकीची महाविद्यालयाचा नोडल सेंटर म्हणून यावर्षी समावेश करण्यात आलेला आहे. या स्पर्धेतील विजेत्या सहा संघांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक भारत सरकारच्या वतीने दिले जाणार आहे. स्पर्धेच्या परीक्षणासाठी व्यवसायिक क्षेत्रातून १२ प्रतिनिधी व केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय विभागातील ६ अधिकारी याठिकाणी परीक्षणाचे काम करणार आहेत. सहभागी प्रत्येक संघामध्ये ६ विद्यार्थी व २ मार्गदर्शक यांचा सहभाग असून एकूण १८७ स्पर्धकांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होणार आहे. 

केआयटीमध्ये २५ ऑगस्टला होणाऱ्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकास्थित बॅक अँड वेच कंपनीचे भारतातील अभियांत्रिकी आणि विकास सेवा प्रमुख अभिजित साळुंखे तर टीसीएसचे शिक्षणसंस्था संपर्क प्रमुख ऋषिकेश धांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. २६ ऑगस्टला होणाऱ्या समारोप v बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टाटा ऑटो कंपनीचे एच आर प्रमुख गजानन मोरे व प्रमुख उपस्थती म्हणून एलटीआय कंपनीचे वरिष्ठ संचालक राजेश लड्डा असणार आहेत.

या स्पर्धेचे संयोजक म्हणून प्रा. अजित पाटील यांच्यावर जबाबदारी आहे तसेच प्रा. अजय कापसे व प्रा.अरुण देसाई हे समन्वयक म्हणून काम करत आहेत. यासाठी कार्यकारी संचालक प्रा. डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी, मार्गदर्शक प्रा. डॉ. एम. बी वनरोट्टी, व प्र. संचालक डॉ एम. एम. मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *