मिडिया कंट्रोल न्यूज चैनल च्या बातमीची नागदेवाडी व पाडळी खुर्द ग्रामपंचायतने घेतली दखल..

कोल्हापुर प्रतिनीधी, ग्रामपंचायत नागदेव वाडी व,पाडळी खुर्द संयुक्त हद्द जिल्हापरिषद कॉलनी लगत गणेश पार्क समोर कचरा पसरुन दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या कडून आमच्या कार्यालयास काही फोटो व्हिडिओज पाठवून देऊन याची माहिती दिली होती. 

मिडिया कंट्रोल मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती, याची दखल घेत तिन्ही ग्रामपंचायतीने कचरा उठाव करून स्वच्छता मोहीम राबवली. 

Advertisements

गणेश पार्क. भोगम पार्क. निसर्ग पार्क. पद्मावती काॅलनी. शिव दत्त काॅलनी. जिल्हापरिषद काॅलनी .मिठारी मळा .दुधगंगा वेदगंगा आपारमेंन्ट .महालक्ष्मी पार्क. बालाजी पार्क .व परिसरातील लोक हैराण झाले होते.  

मिडिया कंट्रोल ला वृत्त प्रसिद्ध होताच. नागदेव वाडी,बालींगा, व पाडळी खुर्द, या ग्रामपंचायतीने तातडीची दखल घेऊन संबंधित घटनेच्या ठिकाणी ट्रॉली, डंपर ,जेसीबी, च्या साह्याने सर्व कचरा उठाव करून ग्रामस्थांना स्वच्छते बद्दल दिलासा दिला.

 मात्र नागदेव वाडी ग्रामपंचायतीच्या श्री पोतदार ग्रामपंचायत सदस यांनी हा कचरा आमच्या हद्दीतील नसून पाडळी खुर्द या ग्रामपंचायतीचे आहे बालिंगा ग्रामपंचायत व नागदेवाडी ग्रामपंचाय कडून नेहमी ट्रॉली, व स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून स्वच्छता राखली जाते, हद्दीचा प्रश्न असल्याने व पूर परिस्थितीमुळे या ठिकाणी कार्पोरेशनचे फिल्टर हाऊस आहे या ठिकाणी आठ दिवस जाण्यास बंदी असते या कारणास्तव कचरा उठाव झाला नव्हता तो कचरा वाऱ्याने रोडवर पसरला होता आमच्या हद्दीत नेहमी स्वच्छता असते काही असंतुष्ट लोकांच्या मुळे नागदेवाडी व बालिंगा गावाची बदनामी होते इथून पुढे याची गंभीर दखल घेतली जाईल असे रवी पोतदार यांनी सांगितले,

पाडळीखुर्द ग्रामपंचायत सदस्या सई सोहनि यांच्या  कडुन पाडळी खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छता केली असून संबंधित ठिकाणी कचरा न टाकण्याचा बोर्ड लावण्यात आला आहे असे माहिती मिळाली.

या सर्व प्रकारातून मात्र मिडिया कंट्रोलच्या बातमीचीच डिजिटल मीडिया वर चर्चा होती व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *