केआयटी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन राष्ट्रीय स्पर्धेचे दिमाखदार उदघाटन

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 8 Second

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योग क्षेत्राच्या अनुभवाची जोड आवश्यक असून ती मिळाल्यास युवकांना भविष्यातील संशोधनात भरपूर यश मिळेल असे मत अमेरिकास्थित बॅक अँड वेच कंपनीचे भारतातील अभियांत्रिकी आणि विकास सेवा प्रमुख अभिजित साळुंखे यांनी व्यक्त केले ते केआयटीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, भारतीय शिक्षण मंत्रालय, इनोव्हेशन सेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणूम बोलत होते, अध्यक्षस्थानी केआयटीचे उपाध्यक्ष साजिद हुदली तर सचिव दिपक चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या मनोगतात अभिजित चौगुले यांनी त्यांच्या उद्योग अनुभवाचे दाखले देत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील संधीचा वेध घेतला तसेच हॅकॅथॉन सारख्या स्पर्धेतून उभारी मिळत असलेल्या नव संशोधकांचे अभिनंदन केले. हायड्रोजन आणि सौर ऊर्जा या क्षेत्रात अनन्यसाधारण बदल घडत असून भविष्य याच पर्यायाने अधोरेखित होणार असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात साजिद हुदली यांनी केआयटीच्या वतीने होत असलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत हॅकॅथॉनसाठी मिळालेल्या नोडल सेंटर म्हणून जबाबदारीचे महत्व सांगितले. या स्पर्धेत अचूकता आणि गती असलेला संघ विजयी होतो त्यामुळे स्पर्धकांनी आपले ध्येय निश्चित ठेऊन वाटचाल केल्यास यश मिळेल असे सांगून त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कार्यकारी संचालक विलास कार्जीन्नी यांनी सर्व उपस्थित स्पर्धक, संघ आणि मान्यवरांचे स्वागत केले. प्रस्ताविक व स्पर्धेची पार्श्वभूमी संयोजक प्रा. अजित पाटील यांनी स्पष्ट केली, आभारप्रदर्शन केआयटीचे सल्लागार डॉ. मोहन वणरोट्टी यांनी केले. सूत्रसंचालन क्षितिजा ताशी यांनी केले. यावेळी नोडल सेंटर प्रमुख म्हणून प्रसाद दिवाण तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी म्हणून मंजित राणा उपस्थित आहेत. प्रा. अजय कापसे व प्रा.अरुण देसाई हे समन्वयक म्हणून काम करत आहेत.दिनांक २५ व २६ ऑगस्ट आशा दोन दिवशी सलग ३६ तास ही स्पर्धा चालणार असून १५ राज्यांतील, २६ संघांमधून जवळपास २५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

 यावेळी अभिजित चौगुले साजिद हुदली सोबत दिपक चौगुले, डॉ. विलास कार्जीन्नी, डॉ. मोहन वणरोट्टी, प्रा. अजित पाटील, प्रसाद दिवाण, मंजित राणा प्रा. अजित पाटील, प्रसाद दिवाण, मंजित राणा, अजय कापसे, अरुण देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *