सध्या कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात बंदीचे आदेश काढले असले तरीही हज यात्रा त्याच वेळेला होईल,सगळे लोक हजला जातील, यंदाच्या यात्रेची तयारी करण्यात येत असून कोरोना व्हायरस संदर्भात मुस्लिम बांधवांनी कोणताही गैरसमज न करता हज यात्रेसाठी मोठ्या संख्येने यावे ,सोशल मीडियावर हज यात्रेसंदर्भात चुकीची माहिती पाठवली जात आहे
या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन हज कमिटीचे चेअरमन जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केले.
इस्लामचा पाचवा हिस्सा म्हणजे हज, या हज यात्रेला ४ ऑगस्ट रोजी सुरवात होणार आहे.
हज संदर्भात एक समीक्षा बैठक घेऊन कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील लोकांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण हज यात्रा कशी करावी , याबाबत असणार आहे. तसेच सोशल मीडियावर हज बद्दल कोणतीही अफवा पसरवू नये असेही आवाहन जमाल जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेस आकाशी मुल्ला, नदीफ देसाई, शाहरूख गडवाले यांची उपस्थिती होती.