कोल्हापूर : पीएफआयवर संघटनेनं देशात विविध अतिरेकी कारवाया करण्याचा कार्यक्रम आखला होता मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या विशेष मोहिमेने हा डाव उधळून लावण्यात आला, तसेच यानंतर देशातील अनेक राज्यात या कारवाईत सहभागी असलेल्यांवर कारवाई झाली, यासर्व गोष्टींच्या मागे पाकिस्तान असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने आज बिंदू चौकात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला, यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून गेला.
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी देशासह अनेक राज्यात केलेल्या छापेमारीत कोल्हापुरातील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली, देश विरोधी कारवाई करण्यासाठी पाकिस्तान अशा संघटना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला, यावेळी देशात घातपाताचा प्रयत्न करत असलेल्या पीएफआय संघटनेवर कायमची बंदी घाला अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी केली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, मंजित माने, शुभांगी पोवार, स्मिता सावंत, रविभाऊ चौगुले, दीपक गौड, विनोद खोत, सुशील भांदिगिरे, विशाल देवकुळे,सुरेश पोवार, धनाजी दळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.