क्राईम रिपोर्टर जावेद देवडी
कोल्हापूर : कोल्हापूर येथे एका ऑटोमोबाईल कंपनीच्या बनावट पार्ट तयार होऊन त्याची विक्री केली जाते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्या कंपनी वर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही . वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आय पी कंपनी नियुक्त अधिकारी रेवणनाथ केकान (पुणे) यांनी पत्रकार परिषदेत केली.
Protect IP ही कंपनी बनावट वस्तू तयार करणाऱ्यांवर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचे काम करते कायदा १९५७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. या कायद्याची अमलबजावणी व बनावट वस्तू प्रतिबंध करण्यासाठी Protect IP ही कंपनी अनेक वर्षांपासून काम करते आहे. तसेच या कंपनीला देशी व विदेशी कंपन्यांचे स्वामित्व रक्षणाचे ( कॉपीराईट ) अधिकार आहेत, त्यानुसार आमच्या कंपनीने शाहूपुरी पोलिस ठाणेत कोल्हापूर शहरा मध्ये प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनीच्या बनावट पार्ट तयार होत असल्याची कल्पना दिली.
त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करावी असे कंपनीच्यावतीने तक्रारही दिले आहे.
तसेच पोलिसानी कॉपीराईट ची कारवाई बंधनकारक असल्याचे माननीय हायकोर्ट मुंबई Criminal Writ Petition Number 4237/2013 दिनांक १३ सप्टे २०१७ रोजी माननीय पोलिस महासंचालक यांना परिपत्रक काढून सर्व महाराष्ट्रभर पाठवावे असे आदेश दिलेले आहेत.
हि सर्व बाब मी शाहूपुरी पोलिस निरीक्षक यांच्या |निदर्शनास आणून दिली. तसेच कंपनीच्या वतीने २१/०९/२०२२ रोजी पोलिस स्टेशनलाही अर्ज केला.
प्रथम आम्ही १९/०९/२०२२ रोजी कंपनीच्या कागदपत्रासह लेखी अर्ज केला २१/०९/२०२२ रोजी माननीय पोलिस अधीक्षक यांना जाऊन भेटलो त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करावी असे सांगितले.
मी त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाणे मध्ये पोलिस निरीक्षक यांना भेटलो त्यांनी लेखी आदेश आणा असे सांगितले म्हणून आम्ही पुन्हा २२/०९/२०२२ रोजी मा. पोलिस अधिक्षकांना भेटलो असता ते म्हणाले कि ते काम पोलिस ठाणयाचे आहे त्यामुळे तुम्ही तेथूनच तक्रार करा किवा त्या ‘विभागाचे डी वाय एस पी यांना भेटा ते कारवाई करतील.
म्हणून आम्ही २२/०९/२०२२ रोजी सायंकाळी मा डी. वाय एस पी यांना भेटलो असता त्यांनी पोलिस निरीक्षक यांना कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले.
वरिष्ठांचे आदेश असताना कारवाई करण्यास टाळाटा पुन्हा आम्हाला मा. पोलिस निरीक्षक यांनी वरिष्ठांचे लेखी आदेश आणा त्यानंतर आम्ही नवरात्रोउत्सव नंतर कारवाई करतो असे सांगितले,
“ताक तुंबा इकडून तिकडे जा कारवाई करण्यास टाळाटाळ करताना निदर्शनात आल्या नंतर”
पुन्हा आम्ही २३/०९/२०२२ रोजी बंद पाकिटात पोलिस अधिक्षक यांना पुन्हा अर्ज केला व तसेच आय जी ऑफिस कोल्हापूर येथे कंपनीच्या नावे लेखी अर्ज केला.
१०/१०/२०२२ शाहूपुरी ठाण्यायाचे पोलिस निरीक्षक यांना भेटलो असता त्यांनी मी कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही असे सांगितले माझ्या विरुद्ध कोर्टामध्ये Writ Petition दाखल करा असे सांगितले आणि आम्हाला परत पाठविले कारवाई न करणे हे वरिष्ठ अधिकारी व हायकोर्ट मुंबई यांच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत त्यामुळे मला असे वाटते कि पोलिस बनावट वस्तू करणाऱ्यांना संरक्षण करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत कि काय ? त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा असे रेवणनाथ केकान (पुणे) पत्रकार परिषदेत दिली.