शिवसेनेची ही मशाल आता गद्दारांना भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही…!

कोल्हापूर : नुकतीच निवडणूक आयोगाने शिवसेनेला ( शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ) हे आश्वासक नाव व कांती घडवणारे मशाल चिन्ह दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामूळे महाराष्ट्राला एक आश्वासक हिंदुत्वाची आणि नवदिशा देणारे व देशात कांती घडवणारे चिन्ह मिळाले. तिच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ५६ वर्षाची शिवसेना, तोच हिंदुत्वाचा विचार घेऊन नवीन कांती घडविण्यासाठी आज कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक सज्ज झाला आहे, ज्या शिवसेनेने व शिवसेनाप्रमुखांनी या गद्दारांना मोठ केलं, त्यांनी भाजपाच्या साथीन शिवसेनाप्रमुखांचा पवित्र धनुष्यबाण गोठवण्याचे पापकर्म केल. शिवसेनेची ही मशाल आता खोकेबहाद्दर गद्दारांना याच मशालीने भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा याच मशालीच्या रूपाने फडकवणार याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मशाल पेटवून कोल्हापूरात हिंदुत्वाचा जागर प्रस्थापित करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उध्दवजी ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, अदित्य ठाकरे साहेबांचा विजय असो… अशा आशयाच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौका दुमदुमून निघाला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमूख रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे,आसिफ अत्तार, संदीप राऊत,विराज पाटील, शशिकांत बिडकर, चंदू भोसले, तात्या मराठे,सुभाष पाटील, धनाजी दळवी, मंजित माने, जोतिर्लिंग चौगुले, विनोद खोत,प्रदीप हांडे, धनाजी यादव, स्वरूप मांगले,अतुल साळोखे,अवदेश करंबे, वैभव जाधव,सचिन मांगले, दीपाली शिंदे,दिनेश परमार,विष्णु पोवार आदी उपस्थित होते

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *