कोल्हापूर : जागतिक टपाल दिन संपुर्ण जगामध्ये साजरा केला जात आहे दिनांक ०९.१०.२०२२ ते दिनांक १३.१०.२०२२ पर्यंत साजरा केला जात आहे. दि.११ हा संपुर्ण भारतामध्ये “फिलाटेली दिवस” म्हणून साजरा केला जात असतो. कोल्हापूर डाक विभागामध्ये सुध्दा फिलाटेली दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. फिलाटेली म्हणजे ” King of Hobbies” म्हटले जाते.
कोल्हापूर हेड ऑफीसमध्ये तिकीट संग्राहक श अशोक सडोलीकर यांच्या दुर्मिळ तिकीटाचे प्रदर्शन नागरिकांसाठी प्रदर्शित करण्यात आले प्रदर्शन पाहण्यास ग्राहकांची तसेच विद्यार्थीची गर्दी दिवसभर होती. तसेच ढाई आखर ही निबंध स्पर्धा आर. के. नगर कोल्हापूर येथील देशभक्त रत्नाप्पा कुभांर शाळेमध्ये घेण्यात आली. कोल्हापूर विभागीय कार्यालय येथे फिलाटेली या विषयावर प्रश्न मंजुषा घेण्यात आली व या स्पर्धेमध्ये आदर्श प्रशाला रंकाळा, देशभक्त रत्नाप्पा कुभांर शाळा आर. के. नगर व जय भारत इग्लिंश स्कूल रुईकर कॉलनी कोल्हापूर या शाळेतील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.तसेच जिल्हातील विविध शाळांमध्ये पोस्ट ऑफीसच्या अधिकारी व कर्मचा-यांनी भेटी देऊन मुलांना पोस्टाबद्दल माहिती दिली.
सायंकाळी ५.०० वाजता या सर्व स्पर्धाचे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम विभागीय कार्यालय, कोल्हापूर येथे घेण्यात आला सर्व विजेत्यांचे पारितोषिक व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अर्जुन इंगळे, अधीक्षक, कोल्हापूर डाक विभाग व निलोफर शेख, सहाय्यक अधीक्षक, मुख्यालय व शाळेचे शिक्षक व कोल्हापूर विभागातील पोस्टल कर्मचारी उपस्थित होते.