भीम पर्वचा रविवारी शाहू स्मारकमध्ये भव्य कार्यक्रम…!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार आणि फक्त दलितांचे नेते याच चौकटीत बांधण्याचे नवे राजकारण घडत आहे. परंतू डॉ. बाबासाहेबांचे कार्य मात्र याही पुढे जाऊन देशातील प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी व्यापक असे आहे. डॉ. बाबासाहेब दूरदृष्टी असणारे द्रष्टे नेते आहेत. त्यांनी समाजातील विविध घटकासाठी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या विविध कार्य पैलूंवर प्रकाश टाकणारा भीम पर्व ज्ञानसूर्याकडून स्वयंप्रकाशाकडे हा नृत्य, गायन आणि संगीत या तिन्ही कलांचा समावेश असणारा प्रबोधनपर कार्यक्रम रविवार दि. १६ऑक्टोंबर २०२२ रोजी सायं. ५:०० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

निर्मिती फिल्म क्लब, शिवतेज फिल्म इंटरनॅशनल आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भीम पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

भीम पर्व या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन अविनाश गायकवाड यांचे लेखन युवराज पाटील यांनी केले आहे. संगीत संयोजन महेश सोनुले यांचे तर नृत्य दिग्दर्शन श्रद्धा शुक्ल व अविनाश गायकवाड यांनी केले आहे. गायन आणि वादन रसिकरंजन वाद्य वृंद यांचे असून केडीसी अकॅडमीचे नृत्यकर्मी यात मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत.

भीम पर्व ज्ञानसूर्याकडून स्वयंप्रकाशाकडे या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक डॉ. कपिल राजहंस, डॉ. नंदकुमार गोंधळी, डॉ. दयानंद ठाणेकर यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेस अविनाश गायकवाड, महेश सोनुले, श्रद्धा शुक्ल, रवींद्र खैरे, राहुल काळे, अरहंत मिणचेकर, सनी गोंधळी,अनुष्का माने, मिलिंद गोंधळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *