कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे ‘रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नामांकित ४० पेक्षा अधिक खासगी आस्थापनांमधील ३ हजार पेक्षा जास्त रिक्तपदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ७ वी ते पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर इ. नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे.
रिक्तपदांची माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३१-२५४६५७७ वर संपर्क साधावा. मेळावा विनामूल्य असून नोकरी इच्छुक जास्तीत- जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.