मोबाईल न दिल्याने पतिचा पत्नीवर जिवघेणा हल्ला…!

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी 

कोल्हापूर : – संत गोरा कुंभार वसाहत बापट कॅम्प येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून अवचित उर्फ सागर गवळी यांने आपली पत्नी राधिका अवचित गवळी हिच्यावर लोखंडी गजाने  मारहाण केली लोखंडी गजाने मारहाण केल्याने ति गंभीर जखमी झाली असून सदर महिलेवर सीपीआर मध्ये उपचार चालू आहेत या घटनेची पार्श्वभूमी अशी की कोल्हापूर मधील संत गोरा कुंभार वसाहत बापट कॅम्प येथे अवचित गवळी आपल्या कुटुंबासह राहत असुन त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे.आरोपी यास दोन मुले आहे

Advertisements

आज सकाळी ८ : ०० ते ८ : ३० वा. राधीकाचा पती आरोपी अवचित उर्फ सागर गवळी याने आपल्या पत्नीकडे मोबाईलची मागणी केली तिला विचारले फोन कोणास केला होता तिने फोन कोणास केला हे पण सांगितले नाही व फोन देण्यास नकार दिल्याने पतीने रागाने कोपऱ्यात पडलेल्या लोखंडी गजाने तिच्या डोक्यामध्ये वार करून तिला गंभीर जखमी  करून स्वतः शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर झाला ही घटना सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान घडली सदर घटनेचा भा व.वि.स.३०७ प्रमाणे गुन्हा शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके या करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *