गडकिल्ले आपल्याला शिवछत्रपतींच्या शौर्याची अनुभूती देणारा अनमोल ठेवा आहे : खासदार धनंजय महाडिक
भाजपा कोल्हापूर तर्फे आयोजित "किल्ले" स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न....!

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षातर्फे कोल्हापूर शहरांतर्गत बावीस प्रभागांमध्ये झालेल्या किल्ला स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे संपन्न झाला.विजेत्या स्पर्धकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले

बक्षिस वितरण सोहळ्यात बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले गडकिल्ले हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. आपला अभिमान आणि अस्मिता आहे. आपल्याला शिवछत्रपतींच्या शौर्याची अनुभूती देणारा अनमोल ठेवा आहे. मुलांमध्ये गडकिल्ल्यांविषयी आवड निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.यावेळी पुरातत्व खात्याविषयी माहिती, पन्हाळा किल्ल्यावरील संशोधन तसेच इंडो रोमन संस्कृतीचा कोल्हापूर आणि परिसरावर पडलेला प्रभाव या विषयावर अभ्यासक .सचिन पाटील यांचे झालेले अभ्यासपूर्ण व्याख्यान लहान मुलांसह इतरांनाही प्रेरणादायी ठरले.या समारंभास मा.राहुल चिकोडे,मा.सत्यजीत कदम, मा.महेश जाधव,मा.विजय सूर्यवंशी, मा.आशिष ढवळे,मा.किरण नकाते, मा.अशोक देसाई,मा.विजय खाडे-पाटील, मा.सुनील मोहिते, मा.विजयसिंह खाडे,मा.विजेंद्र माने,मा.अद्वैत सरनौबत,मा प्रताप देसाई,मा.संतोष लाड ,विजय अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *