Share Now
मुंबई : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण याबाबत चर्चा झाली. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, भारत नव तंत्रज्ञानाचा वापर करत उद्योग क्षेत्रात प्रगती करत आहे. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मुळे भारताने औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या माध्यमातून आपण नवीन उद्योगधंदे भारतात आणू शकतो. आपल्या देशात कुशल कामगार असून, जागतिक पातळीवरील नव उद्योग भारतात सुरू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान शिकण्यासाठी विविध भाषा अवगत असणेही आवश्यक असल्याचे सांगून, राजदूत श्री. रावत यांच्या चीनी भाषेवरील प्रभुत्वाचे राज्यपालांनी कौतुक केले.
Share Now