महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने २००९ घरांचे व ७२१९ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर प्रतिनिधी (दि.२०): भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या  पाश्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.

या अंतर्गत १९ मार्च २०२० रोजी २००९ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये ७२१९ नागरीकांची तपासणी करण्यात आली. राजारामपुरी ,टाकाळा, आयोध्यापार्क, टेंबलाईवाडी, सिध्दार्थनगर, साळोखेनगर, सुर्वेनगर, कात्यायनी कॉम्प्लेक्स, शाहुपार्क,एस.एस.सी बोर्ड, प्रतिभानगर, राजारामपूरी, शाहुनगर, क्रशरचौक, लक्षतीर्थ वसाहत, जिव्हाळा कॉलनी, मंगळवार पेठ, रविवार पेठ,    वारेवसाहत, जवाहरनगर व खोलखंडोबा या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण  करण्यात आले त्यामधे १५ फेब्रुवारी नंतर परदेशवारी केलेल्या नागरीकांची संख्या ७  आहे . यामध्ये सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे आढळुन आलेले नाहीत. दि.१८ मार्च २०२०  पासून एकूण ७७१८ घराचा सर्व्हे पुर्ण केला असून यामध्ये १७७६२  नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १५ फेब्रुवारी नंतर परदेशवारी केलेल्या नागरीकांची संख्या २३  आहे यामधे सर्दी,ताप, खोकला इत्यादी लक्षणे आढळुन आलेले १  व्यक्ती आहे. सदरचा             सर्वे नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचाऱ्यामार्फात करण्यात आला आहे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *