गॅस्ट्रो बाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करा आमदार ऋतुराज पाटील यांच्या डॉक्टरांना सूचना….!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 39 Second

दऱ्याचे वडगाव गॅस्ट्रो बाधित रुग्णाची आम. ऋतुराज पाटील यांच्या कडून विचारपूस 

कोल्हापूर : – दऱ्याचे वडगाव (ता.करवीर) येथे दूषित पाण्यामुळे अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.गावातील ६० बाधित रुग्णावर सीपीआरसह अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आज आमदार ऋतुराज पाटील यांनी सीपीआर येथे भेट देवून गॅस्ट्रोबाधित रुग्णांची विचारपूस केली.गेल्या आठवडाभरापासून आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविकाच्या मार्फत चालू असलेल्या सर्वेक्षणामध्ये गावात गॅस्ट्रोची लागण झाली असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे गावातील अनेक रुग्णावर सीपीआरसह अन्य खासगी 

रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी सीपीआर येथे गॅस्ट्रो बाधित रुग्णाची भेट घेवून तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी रुग्णाचे नातेवाईकांना भेटून रुग्णाच्या प्रकृती विषयक चौकशी केली.रुग्णावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी डॉक्टरना दिल्या.

पाणी पुरवठा संदर्भात आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा

     गावातील पाणी पुरवठा संदर्भात आणि आरोग्य तपासणी बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांच्याशी फोन वरून संपर्क साधत गावात आरोग्य पथके नेमून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिल्या. ग्रामपंचायत प्रशासनालाही गावात साथ आटोक्यात येईपर्यंत टँकर द्वारे पाणीपुरवठा करा अशा सूचना देखील दिल्या.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कांबळे, डॉ महेंद्र बनसोडे,डॉ विजय बर्गे यांच्यासह दऱ्याचे वडगाव सरपंच अनिल मुळीक आणि रुग्णाचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *