Share Now
कोल्हापूर :- संविधान दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये आज प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास उप आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, वरिष्ठ लेखा परिक्षक मिलींद कुभार, उपशहर अभियंता नारायण भोसले, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशम अधिकारी तानाजी कवाळे, नगरसचिव सुनिल बिद्री, इस्टेट आफिसर सचिन जाधव, आस्थापना अधिक्षक राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राम्बरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंघ रजपुत, रवका अधिकारी प्रशांत पंडत, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांच्यासह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share Now