कोल्हापूर : शहरातील यात्री निवास/लॉजिंग व्यवसाय धारकांचे व्यवसाय परवाना साठी महापालिकेच्या परवाना विभागामार्फत विशेष कॅम्पचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये १७ व्यवसायधारकांनी आपली कागदपत्रांची पुर्तता करुन प्रकरणे सादर केली. यापैकी ४ प्रकरणे मंजूर करुन परवाना देण्यात आला. या विशेष कॅम्पचे ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा. संचालक रामचंद्र महाजन यांच्या मागदर्शनाखाली हा कॅम्प घेण्यात आला.
या कॅम्पला यात्री निवास/लॉजिंग व्यवसायधारक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सोमवारी ३० व्यवसायधारकांनी या कॅम्पला भेटी दिल्या. यापैकी १७ व्यवसायधारकांनी आपली कागदपत्रांची पुर्तता करुन प्रकरणे सादर केली. यापैकी ४ प्रकरणे मंजूर करुन परवाना देण्यात आला. तर १३ व्यवसायधारकांनी नविन परवाना मागणी अर्ज व कागदपत्रांची सविस्त माहिती घेऊन अर्ज घेऊन गेले. या कॅम्पमध्ये सादर झालेल्या प्रकरणांवर नगररचना विभाग, फायर विभाग, घरफाळा विभाग व आरोग्य विभाग यांचेमार्फत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. शहरातील यात्री निवास/ लॉजिंग व्यवसायाकरीता परवाना देणेची प्रकरणे कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीमुळे बरेच वर्षे प्रलंबित होती. यात्री निवास/लॉजिंगसाठी आवश्यक परवाना देणेसाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार अपूरी कागदपत्रांची पुर्तता करुन परवाना देण्यात येत आहे.
या विशेष कॅम्पमध्ये परवाना अधीक्षक अशोक यादव, नगररचना विभागाकडील कनिष्ठ अभियंता विवेक चव्हाण, मयुरी पटवेगार स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, घरफाळा अधिक्षक तानाजी मोरे, परवाना निरीक्षक मंदार कुलकर्णी, रविंद्र पोवार, विजय वाघेला, बाळासाहेब जाधव व निलेश कदम तसेच आरोग्य निरीक्षक उपस्थित होते