विशेष वृत्त प्रकाश कांबळे
कोल्हापूर : वाठार तालुका हातकंणगले येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये समूह नृत्य स्पर्धेत कन्या विद्या मंदिर अंबप च्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला यावेळी समूह नृत्य, प्रश्नमंजुषा, समूहगीत, नाटीकरण, कथाकथन या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये वाठार, अंबप, अंबपवाडी, निवळे वसाहत वाठार, साखरवाडी वाठार, किणी , घुणकी या शाळेतील मुला मुलींनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले तालुका गटशिक्षणाधिकारी श्री जे टी पाटील यांच्या हस्ते तर केंद्रप्रमुख बाबासाहेब सिद यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.समुहनृत्य मध्ये भंडारा लेते जोगव्याला जाते हे गीत सादर करून उपस्थित शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनींची कौतुकाची थाप मिळवली व हे गीत पुन्हा (वन्ससमोर) सादर करण्यात आले
या मुलींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक मारुती पाटील ( उपजिल्हाध्यक्ष शिक्षण समिती कोल्हापूर जिल्हा) यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले तर अध्यापिका श्रीमती जयश्री साठे व अध्यापक वामन माने यांनीही मुलींना विशेष सहकार्य केले