मेस्सीची स्वप्नपूर्ती….! अर्जेंटिनाने रचला इतिहास…..!
FIFA World Cup 2022....

MEDIACONTROL NEWS NETWORK

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये बाजी मारत विश्वचषक आपल्या नावे केला. या लिओनेल मेस्सी याच्या शानदार कारकिर्दीची अखेर विजयाने झाली. 

Advertisements

विजेतेपदाचे दावेदार म्हणून या सामन्यात उतरलेल्या फ्रान्सवर दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या वीस मिनिटात फ्रान्स संघ केवळ एकदाच अर्जेंटिनाच्या क्षेत्रात धडक देऊ शकला. २० व्या मिनिटाला फ्रान्सच्या बचावपटूने केलेल्या धसमुसळ्या खेळाचा फायदा उठवत मेस्सीने मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत संघाला आघाडीवर नेले.

अतिरिक्त वेळेस गेलेल्या सामन्यातील पहिला हाफ अर्जेंटिना संघाने गाजवला. त्यांना गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या होत्या. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. अतिरिक्त वेळेतील दुसऱ्या हाफच्या तिसऱ्याच मिनिटाला लिओनेल मेस्सी याने पुन्हा एकदा करामत दाखवत गोल मारत अर्जेंटिनाला विजेतेपदाच्या जवळ आणले. अतिरिक्त वेळ संपण्यासाठी केवळ तीन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना फ्रान्सला पुन्हा एकदा पेनल्टी बहाल करण्यात आली. एम्बाप्पेने ती पेनल्टी गोल मध्ये बदलत संघाला पुन्हा बरोबरी साधून दिली. अतिरिक्त वेळेतील अखेरचे काही सेकंद शिल्लक असताना अर्जेंटिनाच्या गोल रक्षकाने मीयाने याचा प्रयत्न हाणून पाडत संघाला पराभवापासून वाचवले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *