Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापुर (विशेष प्रतिनिधी शरद माळी) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यानी स्थापन केलेल्या ‘दर्पण’ दैनिकाचा स्थापना दिवस ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो .या दिवसाचे औचित्य साधून उपेक्षित आणि वंचिताना अन्नदान करत महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वतीने विधायकतेची जोड़ देत शुक्रवारी पत्रकार दिन साजरा करुन समाजासमोर एक आदर्श जपला .
युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि मीडिया कंट्रोल न्यूजचे संपादक व राष्ट्रप्रथमचे कार्यकारी संपादक शिवाजी शिंगे यांच्या संकल्पनेतून दसरा चौक येथे हा कोल्हापुरी थाळी उपक्रम राबवला गेला .
या उपक्रमाचा शुभारंभ रोटरी क्लब ऑफ करवीरचे चेअरमन आणि निपाणी येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कुलचे व्हाइस चेअरमन उदय उर्फ प्रशांत पाटील यांच्या हस्ते झाला. सांगली च्या नगरसेविका उर्मिला बेलवलकर, उदय बेलवलकर, ज्येष्ठ पत्रकार सुनंदाताई मोरे,कायदेतज्ञ अॅड.संदीप पवार युवा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष रतन हुलस्वार , राज्य उपाध्यक्ष जावेद देवड़ी, कोकण विभागीय अध्यक्ष अमोल पोतदार, प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव वळवडे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, जिल्हाध्यक्ष शरद माळी, कोल्हापूर थाळीचे व्यवस्थापक उदय प्रभावळे , स्वप्निल मुळे , शिवाजी माझगावकर आदी उपस्थित होते.