सिद्धगिरी हॉस्पिटल येथे आत्याधुनिक एम आर आय व कॅथलॅब मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कोल्हापुरातील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ येथे आत्याधुनिक एम आर आय व कॅथलॅब मशीनचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.

    शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते व खासदार संजय मंडलिक व परमपूज्य स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी हॉस्पिटलची पाहणी देखील केली.सर्वसामान्य व गरीब गरजूंसाठी अत्यंत माफक दरामध्ये सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या देण्यात आले आहेत. या अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून गोरगरिबांना उपचार करणे सोपे जाणार आहे. दरम्यान हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या समारंभ प्रसंगी. मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार संजय मंडलिक, डॉक्टर मरजक्के, काडसिद्धेश्वर स्वामीजी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर मोठ्या संख्येने, सिद्धगिरी मठातील विद्यार्थी व परिसरातील नागरिक देखील या समारंभास उपस्थित होते

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *