गोकुळ संलग्न ६,५०० दूध संस्थाच्या कामकाजात येणार सुलभता
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संघाचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोकुळ मिल्क ई सुविधा या मोबाईल अपचा शुभारंभ सोहळा पार पडला. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय परिसरातील स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास आमदार सतेज पाटील,गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात गोकुळ मिल्क सुविधा मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी शेतकरी हा धर्म म्हणून आयुष्यभर काम केले.सामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गोकुळच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आखल्या गोकुळने वीस लाख लिटर दूध संकलनाचे ध्येय समोर ठेवले आहे
ते साध्य करण्यासाठी गोकुळचे पदाधिकारी, संचालक, सुपरवायझर,कर्मचारी, पुरवठादार या साऱ्याने एकसंधपणे काम केल्यास लवकरच ते साध्य होईल.
या प्रसंगी आमदार सतेज पाटील आमदार राजेश पाटील, चेअरमन विश्वास पाटील, ज्येष्ट संचालक अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेगे, बाबासाहेब चौगले , अजित नरके , शशिकांत पाटील चुयेकर , किसन चौगले , रणजितसिंह पाटील , संभाजी पाटील , प्रकाश पाटील , अमरसिंह पाटील , बयाजी शेळके, बाळासो खाडे , युवराज पाटील , संचालिका श्रीमती अंजना रेडेकर , कार्यकारी संचालक योगेश गोडबोले ,बोर्ड सेक्रेटरी एस एम पाटील , व चुयेकर साहेबांचे कुटुंबीय , दूध संस्था प्रतिनिधी , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते