कोल्हापूर : अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवत आज जमियत उलेमा शहर (अरशद मदनी) ग्रुप च्या वतीने कोल्हापूर शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी बिंदू चौक येथील जनसेवा लॅबोरेटरी येथे आज दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी विनामुल्य शुगर तपासणी कैंप आयोजित करण्यात आला.
तसेच या पध्दतीचे समाज उपयोगी कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा संकल्प ही या संघटनेमार्फत करण्यात आला.ही संघटना शोषित,पिडीत,वंचित समाजातील दुर्बल घटकातील वंचितांना उपचार कमीत कमी दरात उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे असे संघटनेचे शहरप्रमुख मौलाना अझर सय्यद यांनी प्रतिपादन केले.
दरम्यान या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ मौलवी मौलाना बशीर साहेब नायकवडी, संघटनेचे शहरप्रमुख मौलाना अझर सय्यद, संघटनेचे सचिव हाफीज समीर वस्ताद, मुफ्ती गुफरान कास्मी, मौलाना मुबीन साहेब, हाफीज जावेद साहेब, मौलाना इम्रान साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.