कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कुस्ती स्पर्धेदरम्यान स्टेरॉईडचा वापर…?

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 3 Second

विषेश वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कुस्ती स्पर्धेदरम्यान विद्यापीठाच्या आवारात सिरींज सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे स्पर्धक पैलवान सिरींजच्या माध्यमातून स्टेरॉईड वापरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाजी विद्यापीठात सध्या अंतर्गत विद्यापीठ स्तरावर कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. विविध राज्यातील विद्यार्थी स्पर्धक यासाठी इथे आले आहेत. दरम्यान विद्यापीठ परिसरात काही ठिकाणी सिरींज पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कुस्ती स्पर्धक कुस्तीसाठी सिरीज द्वारे स्टेरॉईडचा वापर करत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापुरात दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी अग्नीवीर सैन्य भरतीच्या वेळी अशा प्रकारची घटना घडली होती त्यावेळी देखील विद्यार्थ्यांनी स्टेरॉईडचा वापर केला होता. आता शिवाजी विद्यापीठात ही कुस्ती स्पर्धेदरम्यान याच परिसरात सिरीज सापडल्या असून कुस्ती स्पर्धेत ही स्टेरॉईडचा वापर झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे.या घटनेची पुर्ण चौकशी होणार असुन लवकरच सर्व गोष्टीचा उलगडा होईल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *