Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वीर गाथा २.० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटात दि नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल उचगाव या शाळेतील इयत्ता सातवीत् शिकणारा कु. फरहान राज मोहम्मद मकानदार या विद्यार्थ्याने कौतुकास्पद कामगिरीरून निवडक २५ विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातून १८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशातून वीस लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या विद्यार्थ्यांमधून फक्त 25 विद्यार्थी “सुपर २५” म्हणून निवडले गेले. कु. फरहान मकानदार हा महाराष्ट्रातून एकमेव् शालेय विद्यार्थी निवडला गेला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याला मानचिन्ह व रोख रुपये दहा हजार बक्षीस देऊन गौरवण्यात आले. फरहानला त्याचे पालक व नँशनल सोसायटीचे अध्यक्ष हाजी असलम सय्यद व संचालक श्री नासर खान यांचे मार्गदर्शन लाभले. फरहाचे दिल्लीहून कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर शनिवारी त्याचे भव्य स्वागत रॅली काढून करण्यात येणार आहे. या रॅलीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते सकाळी दहा वाजता दसरा चौकात होईल. दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्गे बिंदू चौक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याची माहिती नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन हाजी असलम सय्यद वाईस चेअरमन राहीद खान आणि संचालक नासरखान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.