विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : राजकारणात घराणेशाही अडथळा ठरते हे मान्य आहे. परंतु काम करणाऱ्या नव्या पिढीला पक्षाने संधी दिली पाहिजे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.स्पर्धा परीक्षाबाबत बोलताना ते म्हणाले, स्पर्धा परीक्षा जुन्या पद्धतीने घ्या यासाठी शरद पवार देखील आग्रही आहेत. इतकच नाही तर २०२५ ला स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमत बदल होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नुकतेच विधान केले की पुन्हा एकदा पहाटेचा शपथ विधी होईल. यावर सर्व पक्षातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र व्हिजन फोरम साठी आमदार रोहीत पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता पहाटेच्या शपथविधी बाबतही नेमकं काय घडलं या विषयी ते अजितदादा आणि शरद पवाराच सांगू शकतील. यातील मला काही माहीत नाही. मात्र सध्या काहीं लोकांना मंत्री व्हायचं आहे. फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी पवार कुटुंबियांवर नेहमीच टीका केली जाते असते. आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.महाराष्ट्र व्हिजन फोरम या चळवळी विषयी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी काही राजकीय नेत्यांना टोलेबाजी करून उत्तर दिली. लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची चिन्हे आहेत असे त्यांनी स्पष्ट पणे सांगून रोहित पवार म्हणाले, सध्या भाजप सर्व बाबतीत मागे पडत आहे अनेक निवडणुकांमध्ये त्याचा त्यांना अनुभव आला आहे. राजकारणात घराणेशाही वर बोलले जाते.
‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’साठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत १ लाख लोकांनी मतदान केलं असून २४ हजार लोकांनी सल्लाही दिला आहे. यामधून व्हीजन डाॅक्युमेंट आम्ही सरकारला देणार आहे, असंही पवार म्हणाले. हा प्रकल्प ऑनलाइन सुरू केला. आता महाविद्यालयातही हा प्रकल्प सुरू केला आहे. हा अराजकीय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही दिलेल्या डॉक्युमेंटवर सरकारने काम करावं, असंही रोहित पवार म्हणाले.