केडीसीसीच्या संचालक मंडळात कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड….!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड झाली. बँकेचे अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या निवडीबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्यावतीने या दोघांचा सत्कार झाला.

        याबाबत अधिक माहिती अशी, बँकेमध्ये दोन मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहेत. दिलीप लोखंडे हे बँक एम्प्लाॕईज युनियनचे प्रतिनिधी आहेत. इम्तियाज मुनशी हे कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बँक एम्प्लाॕईज युनियनचे प्रतिनिधी आहेत.

यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप ऊर्फ भय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *