स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान :कुष्ठरोग जनजागृतीसाठी “रन फॉर लेप्रसी” मॅरथॉन स्पर्धा संपन्न….

कोल्हापूर : “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान अंर्तगत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. ३० जानेवारी “कुष्ठरोग निवारण दिन” तसेच ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कुष्ठरोग पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) च्या सहायक संचालक डॉ. उषा कुंभार यांनी दिली.

या पंधरवडयामध्ये जिल्ह्यात विविध कुष्ठरोग जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून ३० जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कोल्हापूर अंतर्गत पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक, शेंडापार्क, कोल्हापूर मार्फत शहरात “रन फॉर लेप्रसी” ही मॅरथॉन स्पर्धा आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, शेंडापार्क येथे आयोजित करण्यात आली. आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. 

Advertisements

“रन फॉर लेप्रसी स्पर्धेत शहरातील २४ शाळांमधून १४ ते १७ वयोगटातील एकूण १०८ मुला-मुलींनी सहभाग घेतला. मुलांची व मुलींची स्वतंत्र ५ किमी पर्यंत दौड आयोजित करण्यात आली. मुला- मुलींना मोफत टी-शर्ट देण्यात आले. सुरुवातीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी “कुष्ठरोगाविषयी” (कुष्ठरोग बाधित व्यक्तीचा सामाजिक भेदभाव करणार नाही) प्रतिज्ञा घेण्यात आली.

  मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षिस वितरण कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात करण्यात आले. आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सहाय्यक संचालक, (कुष्ठरोग) डॉ. उषा कुंभार, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव, जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनचे श्री. फराकटे, वै.अ.प.-ना.कु.प. डॉ. हेमलता पालेकर, वैद्यकीय अधिकारी डी. एन. टी., सहा. सं.आ. से. (कुष्ठरोग) डॉ. परवेझ पटेल, कोल्हापूर, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक भोई उपस्थित होते.  

“रन फॉर लेप्रसी” कुष्ठरोग मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेल्या मुलांची नावे – प्रथम क्रमांक प्रणव हणमंत पाटील, शा. कृ. पंत वालावलकर हायस्कुल, कोल्हापूर (४ हजार रु.), दुसरा क्रमांक रोहित तानाजी चांदेकर, महाराष्ट्र हायस्कुल, कोल्हापूर, (२ हजार ५०० रु.) व तृतीय क्रमांक श्रेयश विनायक गायकवाड, सुसंस्कार विद्यालय, कोल्हापूर (१ हजार ५०० रु.) तसेच जिंकलेल्या तीन मुलींची नावे -प्रथम क्रमांक संस्कृती शिवाजी प्रभू – उषाराजे हायस्कुल, कोल्हापूर (४ हजार रु.), दुसरा क्रमांक देविका प्रविण देसाई, उषाराजे हायस्कुल, कोल्हापूर (२ हजार ५०० रु.) तृतीय क्रमांक सारिका भागोजी कोळपटे, सुसंस्कार विद्यालय, कोल्हापूर. (१ हजार ५०० रु.). स्पर्धेत सर्व सहभागी मुला व मुलींना प्रशस्तीपत्र देण्यात आली, अशी माहिती डॉ. कुंभार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *